महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहा वर्षीय मुलीला बाळाचा सांभाळ करायला सांगून महिलेची आत्महत्या.. पतीच्या जाचामुळे उचलले पाऊल - राजेंद्र चंद्रमनी दास

अवघ्या दहा महिन्याचा मुलगा आणि सहा वर्षीय मुली समोरच आपल्या जन्मदात्या आईने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

दहा महिन्याचा मुलगा आणि सहा वर्षीय मुली समोर आईने केली आत्महत्या

By

Published : Oct 27, 2019, 7:44 PM IST

पुणे -अवघ्या दहा महिन्याचा मुलगा आणि सहा वर्षीय मुली समोरच आपल्या जन्मदात्या आईने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रश्मीता राजेंद्र दास वय-२६ असे मयत महिलेचे नाव आहे. पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे.

दहा महिन्याचा मुलगा आणि सहा वर्षीय मुली समोर आईने केली आत्महत्या


ऐन दिवाळीत पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आपल्या चिमुकल्यांसमोरच फास आवळत रश्मीता यांनी हे जग सोडले. आत्महत्येपूर्वी आपल्या सहा वर्षीय मुलीला तू लहान बाळाचा सांभाळ कर असे म्हटल्यानंतर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.


संबधित घटनेप्रकरणी पती राजेंद्र चंद्रमनी दास वय-३७ याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत रश्मीता यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये पती हे शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details