महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जमीन वाटपावरून मारहाण केल्याने आईची आत्महत्या; मुलावर गुन्हा दाखल - Mother commits suicide in Daund

जमिनीच्या वाटपावारून मुलाच्या सततच्या त्रासाने आणि मारहाणीमुळे आईने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मोठ्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

yavat police station
yavat police station

By

Published : Apr 8, 2021, 4:49 PM IST

पुणे - जमिनीचे वाटप करून देत नाही या कारणावरून आईला वारंवार मारहाण केली. या त्रासामुळे आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील पाटस येथे घडली आहे. याबाबत मोठ्या मुलाने आरोपी मुलाविरोधात यवत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जमिनीच्या वाटपाचा तगादा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६ एप्रिलला दत्तात्रय हळंदे याने पाटस येथे घरी येऊन आई इंदुबाई नथुराम हळंदे आणि वडील नथुराम हळंदे यांच्याशी जमिनीच्या वाटपावरू वाद घातला. शिवाय शिवीगाळ करत मारहाण केली. या त्रासाला कंटाळुन इंदुबाई हळंदे (वय ,70 वर्ष) राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

मोठ्या मुलाने दाखल केली तक्रार

याप्रकरणी मोठा मुलगा अशोक हळंदे याने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी दत्तात्रय हळंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस . नागरगोजे करीत आहेत .

ABOUT THE AUTHOR

...view details