पुणे - 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकांसाठी आजपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. परंतु असे असले तरी पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्र पुरेशा लसींच्यासाठ्या अभावी बंद होती. फक्त पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या दोन रुग्णालयातच आज लसीकरण सुरू होते. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत लसीकरण सुरू होते.
लसीकरण केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांशी वाद -
लसीचा या तुटवड्याचा मोठा फटका सध्या पुणे शहराला बसला आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी त्याचा प्रत्ययदेखील आला आहे. कमला नेहरू रुग्णालयात आज सकाळपासून अनेक नागरीक लस घेण्यासाठी दाखल झाले होते. परंतु आज केवळ नोंदणी झालेल्या 350 नागरिकांनाच लस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तरी या सर्व नागरिकांचा हिरमोड झाला. काही नागरिकांनी तर थेट लसीकरण केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांशी वादही घातला.