महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाबळ येथील विज्ञान आश्रमात विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणातून विज्ञानाचे २०० पेक्षा जास्त प्रयोग यशस्वी - तंत्रज्ञान

पुणे जिल्ह्यातील पाबळ विज्ञान आश्रम संस्थेचे संस्थापक डॉ.एस.एस.कलबाग यांच्या सोळावा स्मृतिदिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने विज्ञान आश्रमातील 200 विविध प्रकल्प व प्रयोगांचे जाहीर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला जिल्हाभरातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भेट देत आहेत.

पाबळ येथील विज्ञान आश्रमात विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणातुन विज्ञानाचे २०० पेक्षा जास्त प्रयोग यशस्वी

By

Published : Aug 2, 2019, 6:28 PM IST

पुणे - ग्रामीण भागांत शिक्षणाच्या अपु-या सुविधांमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यगुण असतानाही नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळत नसल्याने विद्यार्थी दुर्लक्षित रहातात. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील पाबळ येथील विज्ञान आश्रम उभारण्यात आलेले आहे. या प्रकल्पातून अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी प्रयोग तयार केले आहे.

पाबळ येथील विज्ञान आश्रमात विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणातुन विज्ञानाचे २०० पेक्षा जास्त प्रयोग यशस्वी
विज्ञान आश्रम संस्थेचे संस्थापक डॉ.एस.एस.कलबाग यांच्या सोळावा स्मृतिदिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने विज्ञान आश्रमातील 200 विविध प्रकल्प व प्रयोगांचे जाहीर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.डॉ. कलबाग यांनी 16 वर्षांपूर्वी पाबळ इथे विज्ञान आश्रम उभारला. सुमारे 30 एकर माळरानावर ग्रामीण जीवनशैलीशी सुसंगत विविध क्षेत्रात संशोधन करून शेती, गृह, उद्योग, व्यवसाय, लघुउद्योग, कुटीरोद्योग याबाबत जागतिक स्तरावर दखलपात्र असे विविध प्रकल्प विकसित केले आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हाभरातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भेट देत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असणारे कौशल्य ओळखुन या प्रयोगांना आम्ही सुरुवात केली. आज पर्यंत २००हुन जास्त प्रयोगांत संस्थेने यशस्वी पाऊल टाकले आहे. यामाध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे जात असल्याचे समाधान आहे, असे संस्थेचे संचालक योगेश कुलकर्णी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details