महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे विभागातील एकूण 12 हजार 267 रुग्ण कोरोनामुक्त, 524 नव्या रुग्णांची नोंद

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.54 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.16 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागातील एकूण रुग्णांपैकी पुणे जिल्ह्यातील 15 हजार 942 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 9 हजार 446 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, सध्या 5 हजार 852 जणांवर उपचार सुरू आहेत.

corona patients in pune division
पुणे विभागातील एकूण 12 हजार 267 रुग्ण कोरोनामुक्त

By

Published : Jun 22, 2020, 9:52 PM IST

पुणे- विभागात रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत 524 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 431, साताऱ्यातील 20, सोलापुरातील 57, सांगलीतील 12 तर कोल्हापूर जिल्ह्यातील चार जणांचा समावेश आहे. पुणे विभागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 19 हजार 932 झाली आहे. यातील 12 हजार 267 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विभागात आतापर्यंत 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.54 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.16 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागातील एकूण रुग्णांपैकी पुणे जिल्ह्यातील 15 हजार 942 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 9 हजार 446 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, सध्या 5 हजार 852 जणांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील एकूण 594 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच 350 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.57 टक्के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण 3.73 टक्के इतके आहे.

सातारा जिल्ह्यात 838 कोरोना रुग्ण असून 643 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 156 आहे. एकूण 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 126 कोरोनाबाधितांपैकी 1 हजार 266 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 679 आहे. 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात 288 कोरोना रुग्ण असून 180 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 100 आहे. एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 738 रुग्ण असून 682 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 48 आहे. एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 लाख 37 हजार 946 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 36 हजार 754 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 192 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 16 हजार 497 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 19 हजार 932 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details