पीएमपीएमएलच्या 90 टक्के नवीन बसेस रस्त्यावर; नवीन १२ मार्गावर धावणार सीएनजी बस - cng buses news
पुणे महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड हद्दीत महानगर पालिकेच्या परिवहन सेवेकडून प्रवासी वाहतूक सुविधा दिली जाते. पीएमपीएमएलकडून आता प्रवाशांच्या सेवेसाठी जवळपास ९० टक्के नव्या बसेस रस्त्यावर उतरविण्यात आल्या आहेत.
पुणे- शहरात सार्वजनिक वाहतूक म्हणून ओळखली जाणारी पी.एम.पी.एम.एल आता नवनवीन योजनांसह नाविन्यपूर्ण रुपात पुणेकरांच्या सेवेत येत आहेत. सर्वसामान्य नागरिक, महिला,आणि विद्यार्थी वर्गाच्या प्रवासाची जीवनवाहिनी म्हणून पी.एम.पी कडे पाहिले जाते. जुन्या बसेस रस्त्याच्या मधोमध बंद पडणे, अनियत्रित होणे, रस्त्यातच पेट घेणे असले प्रकार आता पुणेकरांना दिसणार नाहीत. पी.एम.पी.एम एल प्रशासनाने आता नवीन आलेल्या सर्व सीएनजी बसेस सर्वसामान्य पुणेकरांच्या सेवेत रस्त्यावर उतरवल्या आहेत. आता शहरात फक्त 10 टक्केच जुन्या बसेस रस्त्यावर धावताना दिसून येतील. तर 90 टक्के नवीन सी.एन.जी बसेस पूर्ण क्षमतेने शहराच्या रस्त्यांवर धावताना दिसत आहेत.
पी.एम.पी.एम.एल च्या स्वतःच्या मालकीचे 1339 बसेस
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सुरू असलेली पी.एम.पी.एम.एल च्या सेवेत एकूण 2295 बसेस आहेत. यात पी.एम.पी.एम.एल च्या स्वतःच्या मालकीचे 1339 बसेस तर ठेकेदारांचे सी.एन.जी आणि इलेक्ट्रॉनिक बसेस मिळून 956 बसेस आहेत. त्यापैकी सध्या पुणे आणि पिंपरी शहरात 1210 बसेस हे ऑनरोड असून यामध्ये सर्वाधिक बसेस हे सी.एन.जी च्या आहेत.