पुणे - विभागातील 10 हजार 455 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 हजार 469 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 5 हजार 269 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 264 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.48 टक्के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण 4.52 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्ह्यातील 12 हजार 919 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 8 हजार 125 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, ॲक्टिव रुग्णसंख्या 4 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 264 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.89 टक्के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण 4.14 टक्के इतके आहे.
कालच्या(मंगळवार) बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 576 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 530, सातारा जिल्ह्यात 21, सोलापूर जिल्ह्यात 24, कोल्हापूर जिल्ह्यात 1 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील 766 कोरोनाबाधित रुग्ण असून 560 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, ॲक्टिव रुग्णसंख्या 171 आहे. कोरोनाबाधित एकूण 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.