पुणे -पुणेविभागातील 5 लाख 82 हजार 683 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 8 हजार 286 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण संख्या 9 हजार 340 इतकी आहे. कोरोनामुळे एकूण 16 हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.79 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्ह्याची स्थिती
पुणे जिल्ह्यात सध्या 7 हजार 299 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 3 लाख 99 हजार 308 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 3 लाख 82 हजार 909 रुग्ण कोरोनामुक्त झाले व घरी गेले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 9 हजार 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.89 टक्के आहे.
सातारा जिल्हाची स्थिती
सातारा जिल्ह्यातील एकूण 57 हजार 932 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 55 हजार 142 रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात 948 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुळे एकूण 1 हजार 842 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील 52 हजार 456 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 49 हजार 816 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात 813 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुळे एकूण 1 हजार 827 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.