दौंड (पुणे) -दौंड तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. निवडणुकीसाठी 49 गावांतून एकूण 2 हजार 41 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारी (दि. 4 जाने.) शेवटचा दिवशी 867 उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे 49 ग्रामपंचायतींसाठी एकूण 1 हजार 174 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धावपळ
आपल्या पॅनलच्या उमेदवारांना अडचणीचे ठरतील, अशा उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पॅनल प्रमुखांना चांगलीच कसरत करावी लागण्याचे चित्र दौंड तालुक्यातील विविध गावात दिसून आले. दौंड तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पॅनल प्रमुख आणि इतर उमेदवारांची मोठी लगबग दिसून आली. आपल्या मर्जीतील किंवा आपल्या गटाचे पॅनेलने उमेदवारी दिलेले उमेदवार सोडून इतर उमेदवारांची मनधरणी पॅनेल प्रमुखांना करावी लागली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
867 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे