पिंपरी-चिंचवड (पुणे) - गेल्या दोन दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्ण संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 900 जण कोरोनामुक्त झाले असून नवीन 629 जण बाधित आढळले आहेत. 16 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 24 हजार 311 वर पोहोचली असून पैकी, 17 हजार 106 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महानगरपालिका परिसरात आत्तापर्यंत 408 तर ग्रामीण भागातील मात्र, महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 97 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दिलासादायक.. पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 900 जण कोरोनामुक्त - Latest corona news Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 900 जण कोरोनामुक्त झाले असून नवीन 629 जण बाधित आढळले आहेत.
दरम्यान, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असून सोमवार 727, रविवार 797, शनिवार रोजी 2 हजार 107 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज मृत झालेले रुग्ण आकुर्डी (पुरुष ७९ वर्षे), चिंचवड (स्त्री ८६ वर्षे), निगडी (पुरुष ६६ वर्षे, पुरुष ७२ वर्षे), कासारवाडी (स्त्री ४७ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ९८ वर्षे), किवळे (पुरुष ७० वर्षे), भोसरी (पुरुष ६८ वर्षे), पिंपळे सौदगर (पुरुष ४३ वर्षे), काळेवाडी (पुरुष ५४ वर्षे), इंद्रायणीनगर भोसरी (पुरुष ७४ वर्षे), मोशी (पुरुष ५९ वर्षे), सांगवी (पुरुष ७७ वर्षे), तळेगाव दाभाडे (पुरुष ३५ वर्षे), देहुरोड (पुरुष ६५ वर्षे), म्हाळुंगे (स्त्री ६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.