पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. 21 तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. जिल्ह्यात तब्बल 77 लाख पेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी सात हजार 915 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी 70 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. 14 हजार पेक्षा जास्त अधिकारी आणि पोलीस सुरक्षेसाठी सज्ज आहेत. मात्र, हवामान विभागाने 23 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने अनेक ठिकाणी वॉटर प्रुफ बुथची व्यवस्था केली आहे. मात्र, पावसाचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता आहे.