पुणे - विभागातील 5 लाख 89 हजार 510 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 18 हजार 655 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 12 हजार 804 इतकी आहे. एकूण 16 हजार 341 बाधितांचा मृत्यू झाला आहे. विभागातील मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा -
जिल्ह्यातील एकूण 4 लाख 8 हजार 53 रुग्णांपैकी 3 लाख 88 हजार 610 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 हजार 295 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.24 टक्के आहे.
सातारा जिल्हा -
सातारा जिल्ह्यातील एकूण 58 हजार 723 रुग्णांपैकी 55 हजार 717 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 156 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा -
सोलापूर जिल्ह्यातील एकूण 52 हजार 950 रुग्णांपैकी 50 हजार 216 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 893 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 841 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.