बारामती- शहर पोलिसांनी दौंड तालुक्यातील राहू येथे कारवाई करत १ लाख ३८ हजार रुपये किंमतीचा ५ किलो १८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
यापूर्वी शहरातील आमराई भागात ९ जुलैला ३ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी सुनिता प्रकाश सकट यांना ताब्यात घेतले होते. तर दीपक प्रकाश सकट, सेवक प्रकाश सकट हा कारवाई दरम्यान फरार झाला होते. पोलीस अधिकारी पद्मराज गंपले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन फरार आरोपींचा शोध घेतला असता सेवक सकट हा त्याच्या घरी मिळून आला. त्याकडे अधिक तपास केला असता दौंड तालुक्यातील राहू येथील अनिल पंढरीनाथ सायकर यांच्याकडून गांजा आणत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जात सायकरच्या मालकीचे जय तुळजाभवानी हॉटेलच्या मागे तंदूरच्या भट्टीत तब्बल १ लाख ३८ हजार रुपये रूपये किंमतीचा ५ किलो १८० ग्रॅम गांजा जप्त केला. संबंधित आरोपींवर विविध कलमान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बारामती पोलिसांकडून पाच किलो गांजा जप्त - baramati police news
बारामती पोलिसांनी कारवाई करत तब्बल 5 किलो 180 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
baramati police news
पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, बारामती शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहाय्यक फौजदार संदिपान माळी, पोलीस नाईक ओंकार सिताप, पोलीस शिपाई पोपट नाळे, राजेश गायकवाड,सिध्देश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे,अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, अकबर शेख, उमेश गायकवाड, कांबळे यांनी केली.