महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Snake bites in Pune: पुण्यात वर्षभरात 2 हजारांहून अधिक जणांना सर्पदंश - सर्पदंश बारामती तालुका

जिल्ह्यात मागील वर्षात २ हजार हुन अधिक जणांना सर्पदंश ( Pune Snake Bite ) झाला होता. या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामध्ये बारामती तालुक्यात ( Snake bite in Baramati taluka ) सर्वाधिक ३३९ आणि भोर तालुक्यात २८८ सर्पदंशाच्या ( Snake bite in Bhor taluka ) घटना घडल्या आहेत. वेल्हा तालुक्यात सर्वात कमी ४९ घटना घडल्या आहेत.

Pune Snake Bite
पुणे सर्पदंश

By

Published : Dec 27, 2021, 3:47 PM IST

पुणे : जिल्ह्यामध्ये शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात सर्पदंशाच्या ( Pune rural snake bites ) घटना अधिक आहेत. पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये या घटनांमध्ये वाढ पाहायला मिळते. मुळशी, मावळ, बारामती, वेल्हे यांसह अन्य तालुक्यांमध्ये भातलावणी मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच, बारामती, इंदापूर, भोर, शिरूर या भागांत बागायती शेती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्पदंशाच्या घटना अधिक घडल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

जिवावरही बेतते दिरंगाई
दरम्यान मागील वर्षापेक्षा सर्पदंशाचे प्रमाण यंदा वाढले आहे. त्यासाठी येथील भौगोलिक परिस्थिती (Pune Geographical conditions )कारणीभूत आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जास्त असल्याने येथे सापांचे वास्तव्य अधिक दिसून येते. परिणामी सर्पदंशाच्या घटनामध्ये वाढ होते. अशावेळी रुग्णास तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध ना झाल्याने रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असतो. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्पदंश झाल्यानंतर वैद्यकीय उपचार घेण्याआधी तंत्रमंत्राच्या साहाय्याने त्याचा उतारा करण्याकडेही अनेकांचा कल असतो. अंधश्रद्धांमध्ये अडकलेल्या या आजारावर औषधे उपलब्ध असली तरी उपचारांमध्ये दिरंगाई केली जाते. ही दिरंगाई अनेकदा रुग्णाच्या जिवावरही बेतते.

२०२१ मध्ये पुन्हा सर्पदंशाच्या घटना वाढल्या -
गाई-म्हशींचा गोठा, अडगळीची जागा सर्पदंश झाल्याचे घडलेत. जिल्ह्यात दरवर्षी सर्पदंशाची संख्या वाढत आहे. २०१५ मध्ये जिल्ह्यात १ हजार ६५५ सर्पदंशाच्या घटनांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये १ हजार ८३०, २०१७ मध्ये ही संख्या खूप कमी झाली. मात्र, २०२१ मध्ये पुन्हा सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत.

जनजागृती करणे महत्वाचे -
ग्रामीण भागात दिवसेंदिवस सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबतीत अधिक सजगता बाळगण्याची गरज आहे. सर्पाचा अधिवास संपल्याने साप घराच्या परिसरात दिसण्याच्या आणि त्याचा दंश होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे सर्पदंश आणि त्यासंबंधी घ्यावयाची काळजी यासंदर्भात जनजागृती करणे महत्वाचे आहे, असे सर्पमित्र गणेश जाधव यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details