बारामती (पुणे)- तालुक्यात जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना राज्य शासनाच्या वतीने अनुदान प्राप्त झाले असून सुमारे 5 कोटी 67 लाख 73 हजार रक्कम नुकसानग्रस्तांना मिळाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
अनुदानामध्ये मृत व्यक्ती, पुरामुळे बाधित कुटुंब, मृत जनावरे, पडझड झालेली घरे, शेतजमिनीचे झालेले नुकसान, शेतातील पिकांचे नुकसान अशा पध्दतीने वर्गवारी करण्यात आली असून नुकसानग्रस्तांना शासनाने दिलेल्या जवळपास सर्व अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. बारामती तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. शेतीसह, पिके, घरे, जनावरे यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले होते. महसूल विभागाने पंचनामे पूर्ण करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घेतला होता.
देण्यात आलेली रक्कम