पुणे -कोरोनाच्या प्रतिकारासाठी सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेल्या 'कोविशिल्ड' लसीने भरलेले तीन कंटेनर आज कंपनीतून पहाटे ४.५० वाजता लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले. यानंतर आता आणखी तीन कंटेनर सीरम इन्स्टिट्युटमधून विमानतळाकडे रवाना होणार आहेत. ही लस १६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणाऱ्या देशांतर्गत लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. यावेळी कंपनीचे मांजरी कार्यालय ते लोहगाव रस्त्यावर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
देशभरामध्ये १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. यात सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेली कोविशिल्ड ही लस दिली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने सीरमशी करार केला आहे. यानुसार आज (मंगळवार) पहाटे ४.५० वाजता लसीने भरलेले तीन कंटेनर देशभरामध्ये वितरीत करण्यासाठी पाठवण्यात आले. आता दहा वाजण्याच्या सुमारास आणखी तीन कंटेनर विमानतळाकडे पाठवण्यात येणार आहेत. यावेळी सीरमचे कार्यालय ते विमानतळ या रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली 'कोविशिल्ड' लस