पुणे - नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचे एक जूनला केरळात आगमन झाले आहे. मात्र, अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासाला अडथळे असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
मान्सून केरळात दाखल; मात्र, पुढील प्रवासात अडथळा - महाराष्ट्रात मान्सून आगमन न्युज
महाराष्ट्रात 7 ते 14 जून च्या दरम्यान मान्सून दाखल होत असतो. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता मान्सूनला महाराष्ट्रात दाखल होण्यास विलंब होऊ शकतो. तरीही पुढील तीन ते चार दिवसांमध्ये तयार होणाऱ्या परिस्थितीनुसार मान्सूनची वाटचाल स्पष्ट होईल, असे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर जवळपास सात दिवसानंतर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होत असते. त्यामुळे यंदाही 7 जूनच्या जवळपास महाराष्ट्रात मान्सून येईल, अशी शक्यता होती. मात्र, आता अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या स्थितीमुळे मान्सूनच्या प्रवासाला अडथळा असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच 1 ते 4 जून दरम्यान कोकण, गोवा तसेच मुंबईमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रासह पुणे आणि परिसरात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या काळात नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील वेधशाळेच्या वतीने करण्यात आले आहे.