महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौंड येथे दुचाकीला अडकवलेली पैशांची बॅग चोरी - crime in Daund

दौंडमध्ये दुचाकीला अडकवलेली पैशांची बॅग चोरून नेल्याची घटना घडली आहे.

दौंड पोलीस स्टेशन
दौंड पोलीस स्टेशन

By

Published : Jan 3, 2021, 3:25 PM IST

दौंड-दौंड शहरातील हिंद टॉकीज जवळील बँक ऑफ महाराष्ट्रच्या गेट समोर दुचाकीला पैशांची बॅग अडकवलेली होती. ही बॅग चोरून नेल्याची घटना घडली आहे. या बॅगेत दिड लाख रूपये आणि काही कागदपत्रे होती. याबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीच्या हँडलला अडकवलेली बॅग चोरीला-

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, राज्य राखीव पोलीस दलातील जवान धनाजी रामचंद्र साबळे यांच्या दुचाकीच्या हँडलला अडकवलेली होती. ही पैश्याची बॅग अज्ञात चोरट्याने चोरली आहे.

अज्ञात व्यक्तीवर चोरीचा गुन्हा दाखल-

चोरीला गेलेल्या या बॅगेमध्ये ५०० रुपये च्या ३०० नोटा होता. एकूण रोकड रक्कम दीड लाख रुपये होती. तसेच धनाजी रामचंद्र साबळे यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड देखील चोरीला गेले आहेत. याबाबत राज्य राखीव पोलीस दलातील जवान धनाजी रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details