महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात भाजपच्या महिला नगरसेविकेचा विनयभंग; जीव मारण्याचाही प्रयत्न - पोलीस

पीडित भाजप महिला नगरसेवका या त्यांच्या पतीसोबत आपल्या मुलाला भेटण्यासाठी निगडी येथून चिंचवडच्या दिशेने जात होत्या. तेव्हा, त्यांच्या गाडीला कट मारून आरोपींनी टोयोटा फॉर्च्युनर गाडी नगरेसविकेच्या गाडी समोर आडवी लावली. त्यानंतर अनोळखी आरोपीने महिला नगरसेविकेच्या हाताला धरून गाडी बाहेर खेचले. त्यानंतर त्यांना ढकलून देत त्यांचा विनयभंग केला.

निगडी पोलिस ठाणे.

By

Published : Jul 13, 2019, 12:43 PM IST

पुणे - येथील पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात भाजपच्या महिला नगरसेविकेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी, दोघांविरोधात निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

निगडी पोलिस ठाणे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडित भाजप महिला नगरसेवका या त्यांच्या पतीसोबत आपल्या मुलाला भेटण्यासाठी निगडी येथून चिंचवडच्या दिशेने जात होत्या. तेव्हा, त्यांच्या गाडीला कट मारून आरोपींनी टोयोटा फॉर्च्युनर गाडी नगरेसविकेच्या गाडी समोर आडवी लावली. त्यानंतर अनोळखी आरोपीने महिला नगरसेविकेच्या हाताला धरून गाडी बाहेर खेचले. त्यानंतर त्यांना ढकलून देत त्यांचा विनयभंग केला.

एवढेच नाही, तर त्यांच्या कानशिलात लगावली असे तक्रारीत म्हटले आहे. अशाप्रकारे आरोपीने अश्लील आणि घाणेरडे वर्तन केले. तर दुसरा आरोपी अशोक याने त्यांच्या अंगावर गाडी घाल, असे म्हणून अश्लील इशारेही केले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशोक काळे आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात निगडी पोलिसात ४७ वर्षीय भाजपा नगरसेविकेने तक्रार दिली आहे. या घटनेप्रकरणी, निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details