महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सराईत गुन्हेगार सनी गुप्ताच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई - pune police news

पिंपरी- चिंचवड भोसरी परिसरामधील सराईत गुन्हेगार सनी गुप्ता टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या बाबत माहिती पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.

सनी गुप्ताच्या टोळीवर मोक्का कारवाई

By

Published : Nov 6, 2019, 3:55 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहराच्या भोसरी परिसरामध्ये असलेल्या सराईत गुन्हेगार सनी गुप्ताच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे. त्याच्यावर गंभीर प्रकारचे दहा गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टोळीचा मोरक्या सनी ऊर्फ सँडी कन्हैयालाल गुप्ता (वय-२४), गुरुदत्त ऊर्फ बाबा अशोक पांडे (वय ३२), शशिकांत कन्हैयालाल गुप्ता (वय-२०), विकास शामलाल जैसवाल (वय-१८), शिवाजी किसन खरात (वय-२३) अशी गुन्हा दाखल झालेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार सनी गुप्ता हा टोळी बनवून भोसरी परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने अनेक गुन्हे केले आहेत. त्याच्या टोळीत तरुण गुंड आहेत. त्यामुळेच सनी गुप्ताच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या बाबतचा प्रस्ताव भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक गुन्हे देवेंद्र चव्हाण यांनी पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्यामार्फत सादर करण्यात आला. हा प्रस्ताव पारित करण्यात आला असून सनी गुप्ता टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले आहेत.

सदरची कारवाई उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक गुन्हे देवेंद्र चव्हाण, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण, अनिकेत पाटोळे यांच्या पथकाने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details