आळंदी(पुणे) -मोहिनी एकादशीचे औचित्य साधत आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. यावेळी रंगेबीरंगी विविध फुलांच्या सुवासाने गाभारा आणि समाधी स्थळावर सुगंध दरवळत होता. परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे भाविकांना मंदिरात प्रवेशास बंदी आहे. त्यामुळे भाविकांना मंदिर परिसरातील ही लोभणीय सजावट पाहण्यास मुकावे लागत आहे.
मोहिनी एकादशी निमित्ताने ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट
संपूर्ण वर्षात २४ एकादशी असतात. प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आणि वेगळे महत्व आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. या एकादशीला पौराणिक महत्व प्राप्त आहे.
मोहिनी एकादशी कथा
पौराणिक साहित्यामध्ये मोहिनी एकादशीच्या विविध कथा सांगीतल्या जातात. मोहिनी एकादशीची कथा श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितली होती. ती अशी, युधिष्ठिराने देवकीनंदनास प्रश्न केला वैषाख महिन्यातील एकादशीला काय नाव आणि त्याची काय कथा आहे. हे कान्हा कृपया ही कथा सांगावी. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले धर्मराज मी जी कथा सांगतो आहे ती वशिष्ठ ऋषींंनी मर्यादा पुरूषोत्तम रामाला सांगितली होती. एकदा रामाने वसिष्ठ ऋषींनी प्रश्न केला गुरूवर्य एखादे असे व्रत सांगावे, की ज्यामुळे पापमुक्ती मिळेल आणि सर्व दुखांचा विनाष होईल. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी सांगितले, की मोहिनी एकादशी व्रत अतीउत्तम आहे.