मुंबई : मुस्लिम धर्मात पलित्र मानला जाणारा ईद महिन्यास प्रारंभ होत आहे. या महिन्याला मुस्लिम धर्मात अनन्यसाधारण महत्व असते. रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडून निरंकारी उपवास केले जातात. दरम्यान, मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील मोहम्मद अली रोड हा ओळखला जातो त्याच्या गर्दीसाठी. मात्र, उद्यापासून सुरू होणाऱ्या रमजाननिमित्त हा रस्ता अधिकच सजू लागला आहे. विविध प्रकारच्या खजूर विविध प्रकारच्या बर्फी पेढे मिठाया तसेच विविध खीरींनी दुकाने ओसंडून वाहत आहेत. मीनारामजीतला लावून असलेल्या या बाजारात भर दुपारी ग्राहकांनी गर्दी केली होती.
विशेष खाद्यपदार्थ : संध्याकाळनंतर तर या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसते असे दुकानदार सांगतात. इथल्या एका हॉटेल व्यावसायिकाने यंदा रमजान साठी विशेष वीस मेनू तयार केले आहेत. तर इफ्तारीनंतर सुरू होणाऱ्या जेवणासाठी त्यांनी 35 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडे पलेटर, संदल, चिकन टिक्की, चिकन रेशमी बरा, चिकन तंदुरी, रुमाली रोटी, याशिवाय अनेक नवनवीन पदार्थ आपण तयार करत असल्याचे अब्दुल रहमान सांगतात.