पुणे- आरएसएस देशाची दुश्मन आहे. एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी आम्ही शेवटपर्यत लढणार आहोत. भाजप सरकार ईव्हीएमचे सरकार आहे, अशी टीका माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी केली आहे.
एनआरसी, सीएएला विरोध करण्यासाठी आझाद मैदानात विद्यार्थी संघटनांमार्फत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी.जी. कोळसे पाटील यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. अमित शहा यांची बॉडी लँग्वेज पाहून संसदेत ते गुंड वाटतात. मुंबईत आयोजित केलेला एनआरसी विरोधातील मोर्चा भायखळा येथून निघणार होता. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली. कारण मुंबई पोलीस आयुक्त हे नागपूरला फडणवीस यांच्या बाजूला राहतात. त्यांचे सहा महिने देखील फडवणीस सरकारने वाढवले होते. शिवसेना वेगळी व्हावी यासाठी मी 2014 पासून प्रयत्न करत होतो, असे माजी न्यायमुर्ती बी.जी कोळसे म्हणाले.