पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात मोबाईल हिसकावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अटक केली असून 3 लाख 64 हजार रुपये किंमतीचे 23 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. संजय गजानन मरगुरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो गुन्हेगार अक्षय चव्हाणच्या साथीने मोबाईल चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अद्याप अक्षय फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मोबाईल हिसकावणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; 23 मोबाईल हस्तगत
संजय गजानन मरगुरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो गुन्हेगार अक्षय चव्हाणच्या साथीने मोबाईल चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अद्याप अक्षय फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-2 चे अधिकारी गस्त घालत होते. तेव्हा, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या पथकातील कर्मचारी शिवाजी मुंढे आणि अतिक कुडके यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार हा गवळीमाथा येथे येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधीत ठिकाणी सापळा रचून आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता. आरोपी अक्षय चव्हाण च्या मदतीने पिंपरी-चिंचवड शहरातील मोहननगर, जाधववाडी, मोशी, चिखली, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिंचवड, निगडी, रावेत परीसरातून नागरिकांचे 23 महागडे मोबाईल हिसकावले असल्याची कबुली आरोपी संजय याने दिली आहे. अद्याप अक्षय हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संजय निलपत्रेवार, दिलीप चौधरी, शिवानंद स्वामी, केराप्पा माने, वसंत खोमणे, महिला पोलीस उषा दळे, विपूल जाधव, नामदेव कापसे, आतिष कुडके, शिवाजी मुंडे अजित सानप, राजेद्र शेटटे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.