पुणे -पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी मोबाईल मार्केट येथे असणाऱ्या श्री रूपम मोबाईल शॉपीमध्ये बॅटरी चेक करत असताना अचानक बॅटरीचा स्फोट झाला. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्या तोंडाला जखम झाली आहे. स्फोट झाल्यानंतर इतर जण मिळेल त्या ठिकाणी धावताना दिसत होते. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पिंपरी मोबाईल मार्केटमध्ये दोन दिवसांपूर्वी श्री रुपम मोबाईल दुकानात ग्राहक मोबाईल दुरुस्तीसाठी आले होते. तेव्हा, मोबाईलच्या बॅटरीची तपासणी करत असताना अचानक तोंडातच बॅटरीचा स्फोट झाला. यात एकाचे तोंड भाजले असून ता व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे.