महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये शेकडो नागरिक उतरले रस्त्यावर; सोशल डिस्टसिंगचा उडाला 'फज्जा' - पिंपरी चिंचवड महानगरपालिका

आनंदनगर परिसरात तब्बल ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे हा परिसर महापालिकेच्या वतीने सील करण्यात आला होता. मात्र, दुकाने बंद असल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे म्हणत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले.

Pimpri
रस्त्यावर उतरलेले नागरिक

By

Published : May 20, 2020, 9:37 PM IST

पुणे- किराणा मालाची दुकाने सुरू ठेवून महापालिकेने अन्नधान्य पुरवावे, या मागणीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. मात्र यावेळी सोशल डिस्टसिंग न पाळल्याने कोरोना विषाणूचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही गंभीर बाब असून प्रशासनाने तत्काळ यावर निर्णय घ्यावा हवा अशी मागणी नागरिक करत आहेत.

रस्त्यावर उतरलेले नागरिक

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठवड्यात आनंदनगर परिसरात तब्बल ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे हा परिसर महापालिकेच्या वतीने सील करण्यात आला होता. मात्र, दुकाने बंद असल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे म्हणत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी काही जणांनी हुल्लडबाजीही करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना इतर नागरिकांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. परंतु असे रस्त्यावर उतरून आपले म्हणणे मांडणे सध्याच्या परिस्थिती योग्य नाही असे काही जणांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details