पुणेMarathi Patya :सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दोन महिन्यांत दुकानदारांनी सर्व पाट्या मराठी भाषेत करावेत या आदेशाची मुदत, 25 नोव्हेंबरला संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, प्रत्येक प्रांतातील त्या भाषेमध्येच म्हणजे महाराष्ट्रात दुकानावरील पाटया मराठीतच असाव्यात असा निर्णय दिला आहे. पुणे शहरातील तसेच उपनगरातील सर्व दुकानदारांना कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी. तसेच सर्व पाट्या मराठी भाषेत, मोठ्या अक्षरातच आहेत की नाही, याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे.
सर्व दुकानदाराच्या विरोधात तीव्र आंदोलन: स्थानिक प्रशासनाने तातडीने दुकानदाराना आणि आस्थापन यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या प्रशासनाच्या आणि सर्व दुकानदाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा पुणे मनसेकडून देण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेला (Pune Municipal Corporation) या संदर्भात मनसेकडून निवेदन देण्यात आलं आहे.
दुकाने आणि आस्थापनावरील पाट्या मराठी भाषेतच : निवेदनात असं म्हटलं आहे की, पुणे शहरातील आणि उपनगरातील दुकाने तसेच आस्थापनावरील पाट्या मराठी भाषेत नसल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले आहे. शॉप अँड एस्ट्याब्लिशमेन्ट कायद्यातील तरतुदी नुसार दुकाने आणि आस्थापनावरील पाट्या मराठी भाषेतच असणं बंधनकारक आहे .परंतु अनेक दुकानदार आणि आस्थापना हे कायदेशीर तरतुदींचा भंग करीत आहेत. सदरील बाब अतिशय गंभीर असून आपल्या कार्यालयाकडूनही याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना मराठी भाषेचा अभिमान तसंच कर्तव्याचे भान नसल्याचं दिसत आहे. प्रशासनाने कारवाई नाही केली तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिला आहे.
हेही वाचा -
- Marathi Boards on Shops : दुकानांवरील मराठी पाट्यांमुळे व्यापारावर परिणाम- व्यापारी संघटनेचा अजब दावा
- Raj Thackeray on Marathi Signboards : दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, राज ठाकरे म्हणाले, मूठभर व्यापाऱ्यांनी...
- Marathi Signboards : मराठी पाट्यांवरील कारवाईला खिळ बसणार; सर्वोच्च न्यायालयाचे पालिकेला 'हे' निर्देश