पुणे -मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी, राज्यव्यापी संवाद शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी आज ते राज्यभरातील स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांसोबत तर, उद्या काही ठराविक वरिष्ठ नेत्यांसोबत संवाद साधणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर; राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद - मनसे संवाद शिबीर पुणे
क्ष बांधणीसह इतर महत्वाच्या विषयांवर राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. कात्रज येथे आज राज्यभरातील जिल्हाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष यांचे शिबीर होणार आहे. तर, शनिवारी डेक्कन जिमखाना येथे सरचिटणीस आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
![मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर; राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद raj](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5433467-thumbnail-3x2-mns.jpg)
मनसेकडून राज्यव्यापी संवाद शिबीराचे आयोजन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर
हेही वाचा -सक्षम विरोधी पक्ष होण्यासाठी नेत्यांनी तळागाळात काम करावे; मनसेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर
पक्ष बांधणीसह इतर महत्वाच्या विषयांवर राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. कात्रज येथे आज राज्यभरातील जिल्हाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष यांचे शिबीर होणार आहे. तर, शनिवारी डेक्कन जिमखाना येथे सरचिटणीस आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकींमध्ये गोपनियता बाळगली जाणार आहे. कार्यकर्त्यांना बैठकीच्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाण्यासही मनाई करण्यात आली आहे.