पुणे : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (MNS leader Vasant More) यांना एका लग्न समारंभात राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार (state opposition leader Ajit Dada Pawar) यांनी ऑफर दिली (offered to join party) आहे. वसंत मोरे मनसे मध्ये नाराज आहेत. त्यांची दखल घेतली जात नाही, असे सातत्याने वसंत मोरे समर्थक सांगत असतात. त्यानंतर नुकतेच मनसेच्या शहर व मनसेच्या वतीने येरवडा मध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वसंत मोरे यांना भाषण करू दिले नाही .त्यामुळे वसंत मोरे नाराज आहेत. शहरातील काही पदाधिकारी माझी लोकप्रियता, माझं काम याला घाबरून आणि पक्ष संपवण्याच्या दृष्टीने काम करत असून; त्यासाठीच ते मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केलेला आहे.
पुढील दिशा ठरवणार : माझ्या कामाची पद्धत आणि माझं काम बघून विरोधी पक्षातले स्थानिक नेते नाही, तर राज्यस्तरावरचे विरोधी पक्ष अशा सगळ्याच पक्षामधून मला ऑफर आहेत. परंतु मी आजही राजमार्गावर आहे, असं वसंत मोरे यांनी सांगितलेलं आहे. साहेब कोकण दौऱ्यावर आहेत. ते आल्यानंतर मी भेटून पुढील दिशा ठरवणार असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
शहरातील पदाधिकारी डावलतात : वसंत मोरे यांना शहर कोर कमिटी सातत्याने डावलत आहे. मध्यंतरी महाबळेश्वरला सुद्धा एक सहल गेली. त्यात सुद्धा वसंत मोरे नव्हते .त्यानंतर तो खाजगी दौरा असल्याचे बोललं गेलं. त्यातून सुद्धा वसंत मोरेची सातत्याने नाराजी आहे. वसंत मोरे हे प्रकाशझोतात आले ते साधारणपणे भोंग्याच्या आंदोलनावर राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका आणि मांडलेले त्यावरचे मत त्यामुळे पक्षाची भूमिका आणि लोकप्रतिनिधी भूमिका वेगळी असू शकत नाही, असं म्हणून त्यावेळी वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून काढण्यात आलं. परंतु त्यानंतर सुद्धा त्यांना झालेल्या सभेमध्ये जाहीर भाषण करण्याची संधी पक्षाने दिली. त्यामुळे वसंत मोरे यांना पक्ष डावलत नाही तर, शहरातील पदाधिकारी डावलत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केलेला आहे.