पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी पदाधिकारी निलेश माझिरे (MNS leader Nilesh Mazire) यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर माझिरे यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश (Shinde Group) केला. यावेळी माझिरे यांच्यावर माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्ह्याध्यक्ष पदाची ( recieved Pune District President Post) जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अंतर्गत गटबाजी : पुण्यात गेले अनेक दिवस मनसेमधील अंतर्गत गटबाजी समोर येत होती. पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सर्व काही अलबेल आहे, असे नाही. पुण्यात वारंवार त्यांचे नेते वसंत मोरे नाराज होतात. राज ठाकरेंचे पुण्यावर विशेष प्रेम असताना पुण्यातील मनसेमध्ये मात्र अंतर्गत गटबाजी सातत्याने उफाळून येत असते. त्याचा फटका आता बसताना दिसत असून माझिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे गटात प्रवेश केला (Nilesh Mazire Joined Shinde Group) आहे.
मोठा फटका :निलेश माझिरे यांना मनसेचे नेते वसंत मोरे यांनी ते शहराध्यक्ष पक्षात प्रवेश दिला होता. तेव्हापासून माझिरे हे मोरेंचे निष्ठावंत आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र माझिरे यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांचा आणि आमचा संबंध संपला, अशी थेट भूमिका वसंत मोरेंनी घेतली होती. तर दुसरीकडे मला देखील वसंत मोरेंची गरज नसल्याचे प्रत्युत्तर माझिरे यांनी दिले होते. माझिरे यांच्या जाण्याने मनसेला पुण्यात आता मोठा फटका बसण्याचे चिन्ह आहेत.
पदावरून हकालपट्टी :निलेश माझिरे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर माझिरे यांनी आपल्या 400 कार्यकर्त्यांसह मनसेला जय महाराष्ट्र केला होता. मनसेच्या शहर कोअर कमिटीवर आणि मनसे नेते बाबू वागस्कर यांच्यावर गंभीर आरोप करत माझिरे यांनी पक्ष सोडला होता, त्यानंतर 'बाबू वागस्कर हटाव मनसे बचाव' अशी मोहीम देखील माझिरेच्या समर्थनार्थ सुरु झाली (Pune District President Post) होती.
गंभीर आरोप :वसंत मोरे यांचे खंदे समर्थक असल्यानेच आपल्याला बाजूला सारत असल्याचा आरोप माझिरे यांनी केला होता. वसंत मोरे आणि मनसे पुणे शहर कोअर कमिटी यांच्यातील वाद काही झाकून राहिलेले नाहीत. अशात आपण मोरे समर्थक असल्यानेच कोअर कमिटीने आपल्याला बाजूला केल्याचा गंभीर आरोप माझिरे यांनी केला होता.