महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बैलगाडीचा कासरा हातात घेऊन अमित ठाकरेंनी दिला शेतकरी संदेश..!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात म्हटले होते. आज खेड तालुक्यातील सावरदरी येथील मनसे कार्यालयात उद्घाटन प्रसंगी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे जिन्स पँन्ट घालून बैलगाडी चालवत उद्घाटन प्रसंगी पोहचले यावेळी अमित ठाकरे यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.

राजगुरुनगर

By

Published : Feb 3, 2021, 10:09 PM IST

राजगुरुनगर (पुणे) - माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी जीन्स पॅन्ट घालून ट्रॅक्टरवर बसलेला पहायचा असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात म्हटले होते. आज खेड तालुक्यातील सावरदरी येथील मनसे कार्यालयात उद्घाटन प्रसंगी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे जिन्स पँन्ट घालून बैलगाडी चालवत उद्घाटक प्रसंगी पोहचले यावेळी अमित ठाकरे यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.


खेड तालुक्यातील सावरदरी येथे मनसे कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मनसे नेते अमित ठाकरे आले होते. यावेळी अमित ठाकरे यांचे स्वागत करत मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या समवेत अमित ठाकरे बैलगाडीत बसून उद्घाटनस्थळी पोहचले यावेळी पहिल्यांदाच बैलगाडीवर बसून अमित ठाकरेंनी बैलगाडीचा कासरा हातात धरून बैलगाडीची सैर केली.

महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी जिन्स पॅन्टवर दिसणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबत पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठीचे पहिले पाऊल मनसे नेते अमित ठाकरे यांनी टाकले असून पुढील काळात महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी जिन्स पॅन्टवर दिसणार असल्याचा विश्वास अमित ठाकरेंनी व्यक्त केला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, तालुकाध्यक्ष संदीप पवार, मंगेश सांवत, नितीन ताठे, सोपान डुंबरे व असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details