पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्ष ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. 'जम्बो हॉस्पिटल'मधील रुग्णांची होणारी गैरसोय दूर करून त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी ठोंबरे यांनी गुरुवारी आंदोलन केले होते. मनसे स्टाईलने आंदोलन करत गेटवरून चढून त्यांनीरुग्णालयात प्रवेश केला होता. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आज त्यांना अटक करण्यात आली.
जम्बो कोविड रुग्णालयाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी मनसेच्या रुपाली ठोंबरे-पाटील यांना अटक - पुणे मनसे महिला शहराध्यक्षांना अटक
'जम्बो हॉस्पिटल'मधील रुग्णांची होणारी गैरसोय दूर करून त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी ठोंबरे यांनी गुरुवारी आंदोलन केले होते. मनसे स्टाईलने आंदोलन करत गेटवरून चढून त्यांनी रुग्णालयात प्रवेश केला होता. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आज त्यांना अटक करण्यात आली.
तब्बल 86 कोटी रुपये खर्च करून पुण्यात हे जम्बो हॉस्पिटल तयार करण्यात आले. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आले आहेत. शिवाय पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यूही रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रूपाली पाटील-ठोंबरे, ऋषिकेश बालगुडे यांच्यासह अन्य मनसैनिक उपस्थित होते. आंदोलनादरम्यान सुरक्षारक्षक आत सोडत नसल्यामुळे रूपाली पाटील यांनी गेटवर चढून आत प्रवेश केला होता. त्यांच्या पाठोपाठ इतरही कार्यकर्त्यांनी आत प्रवेश केला. शिवाजीनगर पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आणि शिवाजीनगर न्यायालयात दाखल केले.
हेही वाचा -'एल्गार' प्रकरणात पुण्यातील आणखी तिघांना एनआयएने केली अटक