पुणे -आमदार घरचा हवा की बाहेरचा? असा कोथरूडकरांना सवाल करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांच पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. आमदार असा असावा की, जो तुमच्या हाकेला धावून येईल. चंद्रकांत पाटील सत्तेत आल्यावर तुमच्या हाताला तरी लागणार आहेत का? असाही प्रश्न राज यांनी पुण्यातील कोथरूड येथील प्रचारसभेत केला.
आमदार घरचा हवा की बाहेरचा, राज ठाकरेंचा कोथरुडकरांना सवाल - मनसे प्रमुख राज ठाकरे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातील कोथरुड येथील प्रचारसभेत भाजपचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांl पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
भाषणातील मुद्दे -
⦁ जेव्हा कोथरुडवर दुसरीकडचा उमेदवार लादला जातो, याचा अर्थ असा होतो की, मतदारांना गृहीत धरलेले असते.
⦁ कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देणं हा सत्तेचा माज आहे.
⦁ जे चंद्रकांत पाटील राज्यात मंत्री होते, ज्या कोल्हापुरात त्यांचं आयुष्य गेलं तिथे तुम्ही निवडणूक का लढवली नाही? मी मागे म्हणलं तसं की सांगली कोल्हापुरात पूर आला आणि तिथला एक माणूस वाहत वाहत कोथरूडला आला.
⦁ चंद्रकांत पाटील यांचे आयुष्य कोल्हापुरात गेलं तरी, ते कोथरूडमधुन का उभा राहत आहेत?
⦁ मध्यंतरी पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा पुण्यात उध्वस्त केला गेला. ज्यांनी उमेदवार हा उध्वस्त केला त्यांना राम गणेश गडकरी माहित तरी आहेत का? आज आपण महापुरुषांना, साहित्यिकांना, कलाकारांना जातीच्या नजरेतून बघायला लागलो आहोत.
⦁ सर्व महापुरूषांना जाती-पातीत विभागले जात आहे.
⦁ कोथरूडमधली निवडणूक ही बाहेरून आलेला उमेदवार विरूद्ध स्थानिक उमेदवार. आमदार असा असावा की जो हाकेला धावून येणारा असावा. चंद्रकांत पाटील सत्तेत आल्यावर तुमच्या हाताला तरी लागणार आहेत का?
⦁ मनमोहनसिंगांनी सांगीतलयं की, सध्या आर्थिकमंदी सुरू झाली आहे. अन् त्याचा फटका महाराष्ट्राला बसणार आहे.
⦁ अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी स्वत: सांगितलयं महाराष्ट्रातील ५ लाख रोजगार गेले आहेत.
⦁ नोटबंदीचा निर्णय चुकला तर, देश खड्ड्यात जाणार असे त्यावेळीच म्हणालो होतो.
⦁ पीएमसी बँक प्रकरणी ३ लोक दगावली आहेत. आणि गुरूवारी रात्री एका महिलेने झोपीच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. आणि आजही (शुक्रवारी) परत एकाचा मृत्यू झाला आहे. हे कुणामुळे घडत आहे.
⦁ पुणे जिल्हा जे वाहन उद्योगाचं देशातील मुख्य केंद्र आहे, तिथे ह्या क्षेत्रात मंदीचं भीषण सावट आहे आणि त्यामुळे त्याच्याशी निगडित उद्योगधंदे बंद पडायला लागले आहेत, ह्या जिल्ह्यात बेकारांची संख्या वाढायला लागली आहे. आणि पुढे हे चित्र अधिक भीषण व्हायला लागणार आहे
⦁ महाराष्ट्रात दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करत आहे.
⦁ गाडी पार्क करण्यासाठी वाहनतळात जागा नाही. सगळी जागा बिल्डरांच्या घशात घातली जात आहे.
⦁ आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने राज्याच्या जाणत्या राजाचा इतिहासच काढून टाकला आहे. गड-किल्ल्य़ांवर लग्नसंमारंभ साजरा करण्याचा निर्णय घेतला जात आहे. याचं कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात गेलेली सत्ता होय.
⦁ पाकिस्तानी, बांग्लादेशी घुसखोर या राज्यात घुसले आहेत. हे पोलिसांना माहिती असणार पण ते काहीच करू शकत नाहीत.
⦁ फक्त आमदार खासदार निवडून देऊन चालणार नाही, जनतेला लक्ष घालावे लागणार आहे.
⦁ महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधीक कर भरण्याचे काम करतो आहे. पण महाराष्ट्रावर कायम अन्याय होत आहे.
⦁ कलम ३७० काढून टाकलं त्याबद्दल सरकारचं अभिनंदन! मात्र, राज्याच्या प्रश्नावर कधी बोलणार.