महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदाराने सभासदाला 'माकड' म्हटल्याचे संपूर्ण शिरूर तालुक्यात पडसाद - आमदार बाबुराव पाचार्णे

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोडगंगा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधाळाने संपूर्ण तालुक्यात राजकारणाने एक वेगळं वळण घेतल्याने या वक्तव्याचे राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे.

आमदारांनी सभासदाला 'माकड' म्हटल्याचे पडसाद

By

Published : Oct 2, 2019, 8:09 AM IST

पुणे - शिरूर तालुक्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आजी-माजी आमदारांची राजकीय चढाओढ सुरू असताना, एकमेकांचा माईक ओढण्याचा प्रकार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 28 व्या सर्वसाधारण सभेत घडला. त्यावेळी विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णेंनी एका सभासदाला 'माकड' म्हटल्याचे पडसाद संपूर्ण तालुक्यात पडले आणि कुरुळी गावासह विविध गावांत आमदारांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

आमदारांनी सभासदाला 'माकड' म्हटल्याचे पडसाद संपूर्ण शिरूर तालुक्यात

हेही वाचा -सुरेश गोरेंना घरी बसवण्यासाठीच आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवणार - दिलीप मोहिते पाटील

सध्याची कारखानदारी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत येत असल्याचा आरोप घोडगंगा कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार अशोक पवारांनी केला होता. मात्र, कारखान्याकडून 'पॉवर परचेस' करार करण्यात आलाच नसून याला कारखाना प्रशासन दोषी आहे आणि त्याचे खापर सरकारच्या डोक्यावर फोडले जात असल्याचा पलटवार आमदार बाबुराव पाचर्णेंनी केला आहे.

तालुक्याचे पालक म्हणून आमदार लोकप्रतिनिधीत्व करत असताना भरसभेत कारखान्याच्याच सभासदाला 'माकडा'ची उपमा दिल्याने त्यांच्या या वक्तृत्वाबाबत निषेध सभा घेत कुरुळीसह आजूबाजुच्या गावांनी बंद पाळला. आमदार पाचर्णेंनी अंबादास बोरकर या शेतकऱ्याला माकडाची उपमा दिल्याप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा -विधानसभा निवडणूक 2019 : कर्जतचे आमदार सुरेश लाड यांचा निवडणूकीस 'ना', रायगडात राष्ट्रवादीला धक्का

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोडगंगा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधाळाने संपूर्ण तालुक्यात राजकारणाने एक वेगळं वळण घेतल्याने या वक्तव्याचे राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details