पुणे -छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक की, धर्मवीर म्हणावे यासाठी चर्चा होत असून यासाठी मोर्चा देखील काढले जात आहे. आत्ता या वादावर आमदार शिवेंद्र राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीर म्हणूनच इतिहासात आहे. त्यामुळे यावर चर्चा होऊ नये असे माझे मत आहे. तुम्हाला लहान पणी देखील संभाजी महराज हे धर्मवीर आहे असेच शिकवले आहे. मग छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीरच म्हटले पाहिजे असे यावेळी शिवेंद्र राजे म्हणाले.
लव जिहाद यासाठी कडक कायदे -धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद प्रकरणी कठोर कायदे करावेत, या मागण्यांसाठी आज समस्त हिंदू समाजाच्या वतीने हिंदु जन आक्रोश मोर्चाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा आदी मागण्या करण्यात आल्या.
हिंदू समाजात भीतीचे वातावरण - हिंदू समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या भीतीला वाचा फोडण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात शहरात हा मोर्चा होतो आहे. मोर्चातील मागण्याची दखल सरकार नक्की घेईल. केंद्रात मोदींचे सरकार आहे. राज्यात आमचे सरकार आहे त्यामुळे या मोर्चाच्या मागण्यांची दखल नक्की घेण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.