पुणे: शिक्षण मंत्री दीपक केसरकर ( Education Minister Deepak Kesarkar ) यांनी शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांच्यावर बोलताना त्या राष्ट्रवादीतून शिवसेनेत शिवसेना संपवायला आलेत असे वक्तव्य केले होते. त्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दीपक केसरकर सुद्धा शिवसेनेच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत होते. दिपक केसकर सुद्धा राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले आहेत, मग त्यावेळीपण हाच विचार होता मग ते त्यासाठीच आले होते का, असा विचार आमच्या मनात येतो? असे मत शिवसेना नेते सचिन अहिर ( Sachin Ahir critics on Minister dipak kesarkar ) यांनी व्यक्त केले आहे.-
MLA Sachin Ahir : दीपक केसरकर यांचा उद्देश शिवसेना संपवण्याचाच होता का? - सचिन अहिर - सचिन अहिर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सचिन अहिर यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्यावर टीका ( Sachin Ahir critics on dipak kesarkar ) केली आहे. मंत्री केसकरकरांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत दिपक केसरकर यांचा उद्देश शिवसेना संपवण्याचाच होता का? असा सवाल केला आहे.
स्वबळावर लढणार: संघटना वाढीसाठी आणि आगामी जिल्हा परिषद निवडणूका स्वबळावर लढण्यासाठी पुण्यात जिल्हाभर आढावा बैठक घेत असून उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्हा आणि बारामती लोकसभा मतदार संघात फिरणार आहोत, असेही सचिन अहिर म्हणाले आहेत. पुण्यातील भोर तालुक्यात आज शिवसेना पक्ष वाढीसाठी ते आले होते. यावेळी त्यांनी विविध आढावा बैठका घेतल्या.
लोकशाहीचा विजय: गुजरात निवडणुकीवर बोलताना त्यांनी सांगितलं की, वेदांत फॉक्स्वागेन सारखा प्रकल्प गुजरातला निवडणुकीच्या तोंडावर पळविण्यात आला. त्याचबरोबर कर्नाटकच्या निवडणुकीच्या तोंडावर सीमावाद उखडून काढला जात आहे. भाजपाची जनतेतली विश्वासार्हता संपलेली आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील आहेत. आपल्या राज्याचे नेते आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे तेथील जनतेने तो निर्णय घेतला असेल. परंतु हिमाचल प्रदेश आणि दिल्लीमध्ये जनतेने लोकशाहीचा विजय केला असल्याचे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.