बारामती (पुणे) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला संबोधन करताना तिन्ही कृषी कायदे रद्द (farm laws repealed) करण्याची घोषणा केली. त्यामुळे वर्षभरापासून आंदोलन करत असणाऱ्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. असे असतानाच भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी कृषी कायद्यावर पुनर्विचार व्हावा, असे म्हटले आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी चंद्रकांत पाटलांनी अमित शहा यांनी केलेले ट्विट नीट वाचावे. त्यांनी जर सांगितले असेल हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. तर तो स्वीकारून राज्यात अशा प्रकारचे राजकारण न करता शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहावे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
MLA Rohit Pawar : चंद्रकांत पाटलांनी अमित शहांचे 'ते' ट्विट नीट वाचावे - रोहित पवार - कृषी विधेयक रद्द प्रकरण
चंद्रकांत पाटलांनी अमित शहा यांनी केलेले ट्विट नीट वाचावे. त्यांनी जर सांगितले असेल हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. तर तो स्वीकारून राज्यात अशा प्रकारचे राजकारण न करता शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहावे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
कृषी कायदा केल्यानंतर केंद्रातील नेत्यांनी राज्यातील भाजपा नेत्यांना या कृषी कायद्याच्या बाजूने जनजागृती करण्याची जबाबदारी दिली होती. त्यावेळी शेतकऱ्यांचे हित लक्षात न घेता पक्षाचे हित पाहिले गेले. मात्र शेतकर्यांच्या आंदोलना पुढे केंद्राला झुकावे लागले. पंतप्रधानांनी तीनही कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमाद्वारे व्यक्त होताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यासंबंधी केलेल्या घोषणेचे वैशिष्ट्य म्हणजे, मोदींनी या घोषणेसाठी 'गुरु पूरब'च्या विशेष दिन निवडला. प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाशिवाय आणखी कोणतेही विचार ते करत नाहीत, हेच यातून दिसते. त्यांनी उत्कृष्ट राजकीय कौशल्य दाखवले आहे, असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पवार म्हणाले, की या संपावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे. बहुतांशी मागण्या मान्य केल्या आहेत. सरकार एसटी कर्मचाऱ्यांबाबत संवेदनशील आहे. एसटी सेवा सर्वसामान्य लोकांसाठी आहे. त्यांना अनेक दिवसांपासून सेवेला मुकावे लागत आहे. आंदोलनात राजकारण घुसत असेल तर एसटी कामगारांनी विचार करावा. लवकरच एसटी कर्मचारी आणि सरकार चांगला निर्णय घेतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.