पुणे : भाजपचे स्वघोषित नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. पवार साहेबांनी अनेक मोठे नेते घडवले त्या मोठे नेत्यांनी पद देखील भूषवली. पण जेव्हा पवार साहेबांवर कोणी टीका करत असेल तर तेव्हा फक्त कार्यकर्तेच लढत असतात.अजित दादा सोडून ज्या नेत्यांनी पदे भूषवली ते देखील गप्प आहे. असे म्हणत पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच भाजपच्या नेत्यांना देखील सुनावले आहे. एमसीएच्या वतीने एमपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी ते बोलत होते.
सरकारला दिल्लीच मार्गदर्शन घ्याव लागते: यावेळी पवार यांना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाबाबत विचारले असता ते म्हणाले की, आधी महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रात व्हायचा. पण आत्ताच्या सरकारला दिल्लीच मार्गदर्शन घ्याव लागत आहे. विस्तार न झाल्यामुळे सामान्य लोकांना अडचणी सोसाव्या लागत आहेत. विस्तार जसा अडकला आहे तसे, विविध मंडळ अडकले आहेत. नुसते घोषणा करणारे हे सरकार आहे. मंत्री पद सोडायचे नाही आणि नवीन मंत्री पद द्यायचे नाहीत, अशी टीका यावेळी पवार यांनी केली.
जातीभेद, धर्मभेद करण्याचा प्रयत्न: यावेळी पवार यांना अहमदनगरच्या नामांतरावरून झालेल्या दंगलीबाबत विचारले असता ते म्हणाले की, ज्याचं नाव देण्यात आले आहे. त्या पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांचे कार्य खूप मोठे होते. त्याच्या राज्यात जातीवाद नव्हता. त्यांचा जन्म त्या जिल्ह्यात झाला असून जर त्यांचे नाव दिले जात असेल तर स्वागत आहे. दंगलीचा विषयाबाबत म्हणायचे तर निवडणुकीत विकासाचा मुद्दा दिसत नाही. तेव्हा जातीभेद, धर्मभेद करण्याचा प्रयत्न काही पक्ष करत असतात. कर्नाटकच्या निवडणुकीत तो प्रयत्न भाजपने केला होता. आज राज्यातील सरकार विकासाच्या बाबतीत कुठेही दिसत नाही. म्हणून त्याच्या हातात एकच मार्ग दिसला. ते कर्नाटकमध्ये झाले ते महाराष्ट्रात होणार नाही. कारण ही संतांची भूमी आहे. असे यावेळी रोहीत पवार म्हणाले.