महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLA Rohit Pawar criticized BJP : तेव्हा भाजपवाले गप्प का बसले; आमदार रोहित पवार यांचा सवाल - भाजपवाले गप्प का बसले

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जात उद्‌गार काढले. ना. चंद्रकांत पाटील हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दलही खालच्या पातळीवर जाऊन बोलले. दिल्लीचे भाजपचे प्रवक्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलले, बेंगलोरला छत्रपतींच्या पुतळ्याचा अवमान झाला, तेव्हा भाजपची मंडळी शांत का बसली (Why did the BJP remain silent) होती असा सवाल आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar criticism of the BJP) यांनी केला. विरोधी पक्षनेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांना स्वराज्यरक्षक ही दिलेली पदवी (Swarajya Rakshak degree) अधिक व्यापक असल्याचेही ते म्हणाले.

MLA Rohit Pawar criticized BJP
आमदार रोहित पवार

By

Published : Jan 3, 2023, 10:54 PM IST

आमदार रोहीत पवार पत्रकार परिषद

बारामती (पुणे) :आमदार रोहीत पवार बारामतीत ते पत्रकारांशी (MLA Rohit Pawar PC in Baramati) बोलत होते. आमदार पवार म्हणाले, स्वराज्यरक्षक (Swarajya Rakshak degree) हा विचार खूप व्यापक आहे. काही लोक धर्मवीर (Sambhaji Maharaj) ही पदवी देतात, काही लोक स्वराज्यरक्षक म्हणतात. तीच अजित पवार यांनी लावली. ज्यावेळी भाजपच्या लोकांनी मैदानात उतरणे गरजेचे होते. त्यावेळी ते शांत बसले. (MLA Rohit Pawar criticism of the BJP) महापुरुषांविरोधात बोलले जात असताना विरोध करण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. आता अजित पवार यांच्या विरोधात राजकारण करत असतील तर लोकच त्यांना शांत (Why did the BJP remain silent) बसण्यास सांगतील.

स्वराज्यरक्षक ही पदवी योग्यच :कोणत्याही पक्षाचा नेता बोलत असताना काही गोष्टी घडतात. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काय वक्तव्य केले हे मी ऐकलेले नाही. पण ते औरंगजेबबाबत काही बोलले असतील तर त्याचा विरोध मी सुद्धा करतो. कोणीही अशा पद्धतीने थोर व्यक्तींबद्दल बोलू नये. काळजीपूर्वकच बोलले पाहिजे. परंतु अजित पवार बोलत असताना त्यांनी स्वराज्यरक्षक ही पदवी दिली असून ती योग्यच आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय युवक कार्यकारीणीत राज्यातील एकाही युवकाचा समावेश नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, बाहेरील राज्यात विचार व पक्ष पोहोचावा, यासाठी असा विचार केला गेला असावा. मी स्वतः पक्षाच्या या निर्णय प्रक्रियेत नसतो. त्यामुळे मला याबद्दल फारशी माहिती नाही.

अहमदनगरच्या नामांतरणाची चर्चा :अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करण्यासंबंधी यापूर्वीही चर्चा झाली होती. कर्जत-जामखेडचा आमदार म्हणून मी त्याचे स्वागत केले होते. या सरकारला नाव बदलायचे असेल तर लोकांना विश्वासात घेऊन लगेच प्रक्रिया करावी. उगाचच त्याचे राजकारण करू नये असेही आमदार पवार म्हणाले. बारामतीच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांची अनुपस्थिती असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, अजित पवार यांचा स्वभाव रोखठोक आहे. भाजपचे लोक राजकीय पतंग उडवत असतील तर त्यांनी शांत बसावे. या कार्य़क्रमाला सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबीय उपस्थित आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details