पुण्यातील कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मन की बात कार्यक्रमावर टिका करत आता पंतप्रधानांनी जनतेची बात ऐकावी, असे म्हटले आहे. पुणे : केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या जाचक कायद्यात बदल घडावा व शनिवारवाडा भोवतालच्या 300 मी. आतील मिळकतींना बांधकामाची परवाणगी मिळावी याकरीता शनिवारवाडा कृति समिती तर्फे आज पुण्यातील जोशी मंदिरात सामूहिक आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जनतेची मन की बात ऐकावी :यावेळी आमदार धंगेकर म्हणाले की, फक्त राजकीय कारणासाठी मन की बात हा कार्यक्रम घेण्यात आला असून गेल्या 7 वर्षात फक्त यामध्ये आश्वासन देण्यात आले. जनतेला भुरळ घालण्याचे काम त्यांनी केले आहे. आज जनता देशोधडीला लागली असून घर असून देखील घरात राहाता येत नाही. हिच बात आत्ता त्यांनी ऐकावी. पंतप्रधानांनी त्यांची मन की बात ऐकण्याऐवजी आता जनतेची मन की बात ऐकावी, असे धंगेकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ज्या देशाचा राजा हा व्यापारी असतो. त्या देशातील जनता ही भिकारी असते, असे म्हटले जाते आणि अशीच परिस्थितीती आज देशात निर्माण झाली आहे. पंतप्रधानांची मन की बात ऐकून आत्ता आमचे कान हे बधीर झाले असून आत्ता त्यांनी आमची मन की बात ऐकावी. आज देशातील परिस्थिती बघितली तर देशात भाकरीची समस्या तयार झाली आहे. आज आपण पाहिले तर कर्नाटकमध्ये भाजपच्या नेत्यांना लोकांकडून हाकलून देण्याचा काम केले जातं आहे. निश्चितच कर्नाटकमध्ये देखील आमचीच सरकार येणार असल्याचे विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
हस्तक्षेप करून बांधकामाला स्थगिती :शनिवार वाडा कृती समितीच्यावतीने गेली कित्येक वर्ष शनिवार वाडा परिसरातील नागरिकाच्या वतीने आपली बाजू मांडली जात आहे. या लोकांना कित्येक वर्षापासून न्याय मिळत नाहीय. या परिसरात 2010 साली पुरातत्व विभागाच्या वतीने एक कायदा झाला आणि त्यात शनिवार वाड्याच्या परिसरात बांधकाम विभागात पुरातत्व विभागाने हस्तक्षेप करून बांधकामाला स्थगिती दिली. आज या नियमावलीमुळे अनेक मंदिरे जे या परिसरात आहे, त्यांचा विकास होत नाही. जे आज हिंदुत्वाची गोष्ट करत आहे, ते आत्ता याकडे दुर्लक्ष करत असल्याचे धंगेकर यांनी सांगितले. तसेच जी रावण वृत्ती सत्ताधाऱ्यांमध्ये आहे, ती कमी करून आमचे प्रश्न मार्गी लावावे, अस साकडं आज प्रभू रामचंद्रकडे करण्यात आल्याचे धंगेकर म्हणाले. यावेळी धंगेकर म्हणाले की, पुरातत्व विभागाच्या नियमावली विरोधात पंतप्रधान तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यातील सर्वच खासदारांना पत्र लिहून हा प्रश्न दिल्ली दरबारी मार्गी लावावा, असे या पत्रात म्हटले असल्याचे सांगितले. आम्ही क्षत्रीय असून आम्ही प्रभू रामचंद्रांचे वंशज आहोत. आम्ही आमच्या वंशजकडे आलो असून त्यांच्याकडे साकडं घातलं असे आमदार धंगेकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :PM Modi Mann ki baat : मन की बातचा आज शंभरावा भाग; मुंबईतून अमित शाह सहभागी