दौंड -दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आज पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन दौंड तालुक्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली. कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी याबरोबरच दौंड तालुक्यातील अवैध वाळू उपशाला लगाम घालण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे .
लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा-
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन अनेक प्रश्नांवर चर्चा केली. सध्या देशात कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. या कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात यावा. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी आमदार कुल यांनी केली आहे.
अवैध वाळू उपशाला लगाम घाला-
दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध रीतीने वाळू उपसा सुरू असतो. दौंड तालुक्यातील विविध ठिकाणी होत असलेल्या अवैध वाळू उपश्याला लगाम घालावा, अशी मागणी यावेळी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
पाणंद आणि शिव रस्ते खुले करण्यासंदर्भात धोरण-
पाणंद आणि शिव रस्ते खुले करण्यासंदर्भात कालबद्ध धोरण ठरवून जलद कार्यवाही करण्यात यावी. तसेच चिबड शेतजमिनीसंदर्भांत धोरण ठरविण्यासाठी इरिगेशन रिसर्च डिपार्टमेंट (IRD), कृषी विभाग व जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बैठकीचे आयोजन करण्यात यावे.
आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
अवैध वाळु उपशाला लगाम घालण्याची आमदार राहुल कुल यांची मागणी
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आज पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन दौंड तालुक्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली.
अवैध वाळु उपशाला लगाम घालण्याची आमदार राहुल कुल यांची मागणी