पुणेNitesh Rane on Punyeshwar Mandir:आपण हातोडा नाही, तर आपण डायरेक्ट कापतो. तीच आपली भाषा असल्याचं वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केलय. पुणे महानगरपालिका येथे पुण्येश्वर मंदिर मुक्तीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी यावेळी ते बोलत होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान आहे का? की पाकिस्तान आणि अफगाणिस्थानमधील शरिया कायदा आहे? जर संविधानानुसार हा देश जर चालत असेल तर महापालिकेत उगाच खुर्च्या गरम करत अधिकारी बसले आहेत. त्यांनी त्यांचे काम केलं पाहिजे. तुमच्या खुर्ची काढायला काहीही वेळ लागणार नाही. अधिकारी यांना कळायला पाहिजे की त्यांना तिथं का बसवलं आहे? आम्ही जर कायदा हातात घेतला तर आतमध्ये बसलेले अधिकारी तोंड सुजून बाहेर येतील. आम्ही कोणतीही परिस्थिती खराब केलेली नाही. आम्ही कायदा तोडलेला नाही. कायदा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडला आहे. हा भारत देश हिंदू राष्ट्र असून या देशात 80 टक्के लोक हे हिंदू राहतात. जर देशात 80 ते 90 टक्के हिंदू लोक राहत असतील तर मग कशाला जिहादी लोकांचे लाड करायचे?
पुण्येश्वरदेखील मंदिर होणार -पुढे नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्र आणि देश आमचा आहे. हा हिंदूंचा देश असून हिंदूंच्या या देशात जर पुण्येश्वरला न्याय मिळत नसेल तर हाकलून लावू. आम्ही जेव्हा बाहेर काढू, तेव्हा पोलीस बांधवदेखील आम्हाला मदत करतील. अयोध्येला आज मंदिर झालं. तसंच मंदिर मथुराला देखील बनणार आहोत. जे काही ज्ञानव्यापीच्या नावाने धिंगाणा घालायच आहे, ते घाला. जसं राम मंदिर झालं, तसंच श्रीकृष्णाचं देखील मंदिर होणार आहे. तसंच पुण्येश्वरदेखील मंदिर होणार असल्याचं यावेळी राणे म्हणाले.