पिंपरी चिंचवड MLA Mahesh Landge Apologies : पिंपरी चिंचवड महापालिका आवारातच उद्योजक नरेश पटेल यांना मारहाण झाल्यामुळं पटेल समाजाचं खच्चीकरण झालं, अशी भावना पटेल समाजानं व्यक्त केली होती. यावर आमदार महेश लांडगेंनी सामंजस्याची भूमिका घेत आम्ही चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तसंच मी सामाजिक कार्यकर्ते नितीन बोऱ्हाडे यांच्या कृत्याबद्दल पिंपरी-चिंचवडचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून समाजाची माफी मागतो, अशा भावना आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही : बांधकाम व्यवसायिक नरेश पटेल यांच्यासारख्या वादाच्या घटना पुन्हा घडू नयेत. यासाठी शहरातील पटेल समाजानं आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. भोसरीतील महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानावर नवरात्रोत्सव सुरू आहे. त्याठिकाणी महाआरतीनंतर पटेल समाजाच्या समुहानं लांडगे यांच्यासोबत या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. यानंतर सुमारे दीड हजार समाज बांधवांसमोर आमदार लांडगे यांनी पटेल समाजाची माफी मागितली. तसंच, चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. आम्ही गेल्या 30 ते 40 वर्षांपासून या शहरात व्यवसाय करत आहोत. 20 वर्षे आम्ही आपल्याला पाहतो. या पूर्वी असा कधीही प्रकार घडला नाही. शहरात आम्ही तुमच्या भरवशानं व्यवसाय करत आहोत. त्यामुळं या प्रकरणात तोडगा काढावा असं साकडं पटेल समाजाकडून घालण्यात आलं.