पुणे -राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ( NCP MLA Jitendra Awhad ) यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत ( Increase in MLA Jitendra Awhad problem ) नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांना वर्तकनगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली अटक केली होती. आता एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप ( Jitendra Awhad accused of molestation ) केला आहे. आव्हाड यांच्याविरुद्ध भादंवि कलम 354 अन्वये ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ( case of molestation registered against Jitendra Awhad ) करण्यात आला आहे.
आव्हाडांनी राजीनामा देऊ नये - यावर आव्हाड यांनी मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करत आहे असे म्हटल आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी जितेंद्र आव्हाड यांना पक्षाच्या वतीने माझ्यावतीने आवाहन करेल की, त्यांनी राजीनामा देऊ नये. कारण मुंब्राच्या लोकांनी त्यांना विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिलं आहे. मंत्री असो की आमदार त्यांचं काम चांगल आहे. लोकांसाठी त्यांनी राजीनामा देऊ नये असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुणे महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली यावेळी त्या बोलत होत्या.