पुणे- राज्यासह उत्तर पुणे जिल्हा दुष्काळी परिस्थितीने होरपळत आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी वाढदिवसादिनी शेलपिंपळगावात ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमातच नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला होता.
दुष्काळी परिस्थितीत खेडच्या माजी आमदाराची वाढदिवसावर उधळपट्टी - अमोल कोल्हे
राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी वाढदिवसादिनी शेलपिंपळगावात ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन केले.

दुष्काळी परिस्थितीत खेडच्या माजी आमदाराची वाढदिवसावर उधळपट्टी
दुष्काळी परिस्थितीत खेडच्या माजी आमदाराची वाढदिवसावर उधळपट्टी
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघात यशाचे शिखर गाठले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार स्वतःच्याच वाढदिवसांनिमित्त लावण्यांवर ठेका धरत आहेत. त्यामुळे या नेत्यांना जिल्ह्यातील दुष्काळ दिसत नाही का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर डॉ. अमोल कोल्हेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलेली आश्वासने विसरले का? असा प्रश्नही विचारला जात आहेत.