पुणे- राज्य सरकारने शेतकऱ्यांची सावकारी कर्जे माफ केली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, हा निर्णय आमच्या सरकारच्या काळातच घेतला गेला होता. काही तांत्रिक बाबींमुळे तो राहिला होता. या सरकारने ही तांत्रिक बाब दूर केली एवढेच आहे, असे वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.
पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. नोंदणीकृत सावकारीपेक्षा खासगी सावकाराची समस्या मोठी आहे. सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र या प्रश्नांवर मार्ग काढला पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे आमदार पाटील म्हणाले.