पुणे -राज्यभरात आज (दि. 13 ऑक्टोबर) भाजपतर्फे मंदिरे उघडण्याबाबत आंदोलन करण्यात आले होते. राज्यातील अनेक मंदिराबाहेर संत, महंत, साधू आंदोलनाला बसले होते. शिर्डीमध्ये आंदोलनासाठी बसलेल्या संत, महंतांना आज सायंकाळी अटक झाली हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
'संत-महंतांना अटक करण्यापर्यंत या सरकारची मजल, याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील' - चंद्रकांत पाटील यांची टिका बातमी
आज राज्यभरात भाजपकडून मंदिर उघडण्याबाबत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शिर्डी येथे आंदोलनात सहभागी असलेल्या साधुंना पोलिसांनी अटक केली. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टिका केली आहे.

चंद्रकांत पाटील
बोलताना आमदार पाटील