जुन्नर/पुणे -राज्यात महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष एकत्र सत्तेत आले असले तरी जुन्नर तालुक्यात मागच्या काही दिवसांपासून आजी आणि माजी आमदारांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोरोनावरून सोशल मीडियात चांगलंच रनकंदन पाहायला मिळत आहे.
जुन्नरमध्ये आजी माजी आमदार आमने-सामने - mla atul benake news
जुन्नर तालुक्यात स्थानिक पातळीवर आजी माजी आमदारांचा एकमेकांवरील आरोपप्रत्यारोपाचा कलगी तुरा जुन्नरकरांनी आजपर्यत पाहिला.
आजी माजी आमदार
तालुक्यात स्थानिक पातळीवर आजी माजी आमदारांचा एकमेकांवरील आरोपप्रत्यारोपाचा कलगी तुरा जुन्नरकरांनी आजपर्यत पाहिला. मात्र आज जुन्नर तालुक्यातील आळे येथील शरदचंद्र आरोग्य मंदिर या कोविड सेंटरचे उद्घाटननादरम्यान माजी आमदार शरद सोनवणे आणि आजी आमदार अतुल बेनके समोरासमोर आले. या नंतर आजी आमदारांनी माजी आमदारांचे तापमान तपासून शांत राहा, तापू नका असाच सल्ला दिला असेल अशी चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती.