महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प ठरणार वरदान; मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी - मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

Pune Mumbai Expressway: पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली आहे. 6 हजार 600 कोटींचा हा प्रकल्प असून 22 मार्च 2019 ला या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.

Pune Mumbai Expressway
Pune Mumbai Expressway

By

Published : Nov 10, 2022, 5:41 PM IST

पुणे -पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी Chief Minister Eknath Shinde पाहणी केली आहे. 6 हजार 600 कोटींचा हा प्रकल्प असून 22 मार्च 2019 ला या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा आणि अपघातावर नियंत्रण मिळवणे या मागचा हेतू आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले - लोणावळा ते खोपोली एक्झिट असा 13.3 किलोमीटर चा प्रकल्प आहे. यामुळे 6 किलोमीटरच अंतर कमी होणार असून प्रवाश्यांची 20 ते 25 मिनिटे बचत होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही सूचना करत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

वाहनचालक प्रवाशांना मनस्ताप - या प्रकल्पामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. तसेच अपघातावर नियंत्रण मिळवणे ह्या मागचा हेतू आहे. बऱ्याचदा बोरघाटात वाहतूक कोंडी आणि दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे वाहनचालक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. पण, हा प्रकल्प होताच यातून प्रवाश्यांची सुटका होणार आहे. दोन्ही बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर अखेरीस पूर्ण करण्याचा मानस एमएसआरडीसीचा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details