पुणे (पिंपरी-चिंचवड) - मिस पिंपरी-चिंचवड स्पर्धेच्या मानकरी ठरलेल्या विशाखा दीपक सोनटक्के यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विशाखा यांनी अगोदर हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. दरम्यान, रक्ताने माखलेली एक डायरी पोलिसांना आढळली असून, त्यामध्ये आत्महत्येचे कारण सापडू शकेल असे सूत्रांनी सांगितले आहे.
'मिस पिंपरी-चिंचवड'च्या मानकरी ठरलेल्या विशाखा यांची गळफास घेऊन आत्महत्या - Miss Pimpri-Chinchwad
मिस पिंपरी-चिंचवड स्पर्धेच्या मानकरी ठरलेल्या विशाखा दीपक सोनटक्के यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विशाखा यांनी अगोदर हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले आहे.
मिस पिंपरी-चिंचवड सौंदर्यवातीच्या स्पेर्धेत त्या मानकरी ठरल्या होत्या
विशाखा यांनी आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास उघड झाले. घटनेची माहिती विशाखा यांचे पती दीपक यांनी पोलिसांना दिली होती. विशाखा आणि पती दीपक हे दोघे सांगवी परिसरात दोन मुलांसह राहतात. रविवारी दीपक हे दोन मुलांसह हॉलमध्ये झोपले होते. तर, विशाखा या बेडरूमध्ये एकट्याच झोपल्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना अगोदर हाताची नस कापून आणि नंतर ओढणीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नुकत्याच झालेल्या मिस पिंपरी-चिंचवड सौंदर्यवातीच्या स्पेर्धेत त्या मानकरी ठरल्या होत्या. शिवाय, त्या योगा प्रशिक्षक देखील होत्या अशी माहितीही समोर येत आहे.